‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ; वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । ‘महत्त्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्ण समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या 99 वर्षांत परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करीत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करून स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे. त्यामुळेच वयाच्या 99 वर्षांमध्ये मी आनंदी आहे; पण समाधानी नाही. मला हिंदुस्थानातच पुनर्जन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे,’ अशी भावना ‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

वयाची 80 वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम, तब्बल 5 लाख किमीचा प्रवास, ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाच्या 17 आवृत्त्या, जगभरात 25 हजार व्याख्याने, 3 कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुसऱया क्रमांकाचे महानाटय़ ‘जाणता राजा’चे 1200 प्रयोग व एक कोटी प्रेक्षक असा थक्क करणारा प्रवास करीत वयाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱया ‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळातर्फे भव्य रंगावली व 99 दीप प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *