Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेल उंचीवर जाऊन स्थिर का ? जाणून घ्या कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । देशात गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे इंधनदरवाढीमुळे धास्तावलेल्या नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी भरभर वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या (Fuel Rates) किंमतींना ब्रेक कसा लागला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी कारणीभूत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव स्थिर असले तरी पुन्हा एकदा हे दर वाढू शकतात. वाढत्या मागणीमुळे अमेरिकेने खनिज तेलाचा दर वाढवला आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन सध्या सामान्य नागरिक आणि विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर 12 दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने हे इंधन स्वस्त होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे: पेट्रोल- 107.56, डिझेल 95.71
नाशिक: पेट्रोल- 107.70, डिझेल 95.85
औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर: पेट्रोल- 107.80, डिझेल 95.97

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *