Petrol-Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचा दर ; क्रूड ऑइल महागल्यानंतर तेल कंपन्यांकडून मोठा निर्णय,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 31 जुलै 2021 रोजी सलग 14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ झाली आहे. या महिन्याची सुरूवात वैश्विक बाजारात कच्चा तेलाच्या भावात घसरण झाल्यानंतर इंधनाच्या वाढत्या दराला ब्रेक मिळाला आहे. (Petrol Diesel Price 31st July 2021 : Check New Rates in Mumbai, Delhi, Kolkata, )

इंधनाच्या दरात बदल झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 101.83 रुपये आणि मायानगरी मुंबईत 107.83 रुपये प्रती लीटर आहे. कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोटलचा दर क्रमशः 102.08 रुपये आणि 102.49 रुपये प्रती लीटर आहे. देशभरातील 25 ते 20 शहरात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रती लीटर आहे. पेट्रोलच नाही तर डिझेलच्या दराने देखील रेकॉर्ड स्तर गाठला आहे. राजधानी दिल्लीत डिझेलचा दर 89.87 रुपये प्रती लीटर आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह अनेक शहरात डिझेलचा दर 90 रुपये प्रती लीटर आहे.

ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार पेट्रोल डिझेल?
कच्चा तेलाच्या दरात वाढ होत असताना लवकरच दर कमी होती अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला इंधनाच्या दरात घसरण होईल असं तज्ज्ञांचं मत होतं. मात्र कच्चा तेलात घसरण पाहायला मिळाली. मात्र पुढील काही आठवड्यात हा ट्रेंड बदलणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *