आरोग्य विषयक ; या गोष्टी खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । माणूस अन्नावाचून काही दिवस जगू शकतो; मात्र पाण्याशिवाय नाही. शरीरातील विषद्रव्यं (Toxins) बाहेर टाकण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळं पाणी म्हणजे जीवन असं म्हटलं जातं. मात्र पाणी अयोग्य प्रकारे प्यायल्यास ते घातक ठरू शकतं. विशेषतः काही पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिणं खूपच त्रासदायक ठरतं. आयुर्वेदात(Ayurveda) याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. असे कोणते पदार्थ आहेत याबद्दल जाणून घेऊ या.  

चणे किंवा चण्याचे चाट :
हरभरे(Gram) म्हणजे काळे चणे किंवा काबुली चणे पचनासाठी जड असतात. त्यामुळे चणे किंवा चण्याचे चाट खाल्ल्यास जठराग्नी तीव्र असणं गरजेचं असतं; पण त्यावर पाणी पिल्यानं जठराग्नी थंडावतो आणि चणे नीट पचत नाहीत. त्यामुळं पोटदुखी (Stomach Ache) उद्भवू शकते.

फळे :
कोणतंही फळ(Fruits) खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. कारण फळामध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते, तसंच आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे असतात. याशिवाय फळांमध्ये साखर किंवा सायट्रिक अॅसिड असते, ज्यामुळे खोकला, घसा खवखवणे यासह पोट बिघडू शकते. म्हणून, फळ खाल्ल्यानंतर, किमान 45 मिनिटं काहीही खाऊ नये आणि पाणीदेखील पिऊ नये.

आइस्क्रीम :
आइस्क्रीम (Ice Cream) खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिऊ नये. यामुळे दात कमकुवत होतात. तसंच घसा खवखवण्याचाही त्रास होऊ शकतो. आइस्क्रीम खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनंतर पाणी प्यावं.

चहा, कॉफी किंवा अन्य गरम द्रवपदार्थ :
चहा(Tea) , कॉफी (Coffee) किंवा अन्य गरम द्रवपदार्थ(Hot Liquids) प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण थंड आणि गरम गोष्टी एकत्र घेतल्यानं आरोग्य बिघडतं. तसंच यामुळे पचनसंस्था मंदावल्यानं पोटात जडपणा, गॅस, आंबट ढेकर येणंआदी त्रास होतात.

शेंगदाणे :
शेंगदाणे(Peanuts) खाल्ल्यानंतर बरेचदा पाणी पिण्याची इच्छा होते; पण ते अतिशय त्रासदायक ठरू शकते. भुईमूग आणि पाणी या दोन्ही विरुद्ध गुणधर्म असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं शेंगदाणे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास खोकला, घसा खवखवणं आदी त्रास होण्याची शक्यता आहे.

गोड पदार्थ :
अनेक ठिकाणी मिठाई(Sweets) खाल्ल्यानंतर पाणी देण्याची प्रथा आहे; पण ते चुकीचे आहे. याबाबतीत करण्यात आलेल्या संशोधनात असं आढळलं आहे की, मिठाईवर पाणी पिण्यामुळे शरीरात साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं. अशा परिस्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.

जेवणानंतर :
जेवताना किंवा जेवल्यानंतर(Meal) लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अन्नाचे नीट पचन होत नाही. यामुळं वजन वाढतं आणि पचनाच्या इतर समस्याही उद्भवतात. जेवणाच्या आधी 45 मिनिटे आणि जेवणानंतर 45 मिनिट पाणी पिऊ नये. जेवताना एक-दोन घोट पाणी पिऊ शकता. तेव्हा आरोग्य चांगले राखायचे असेल तर पाणी पिताना(Drinking Water) वरील गोष्टी लक्षात ठेवा आणि योग्य वेळी, योग्य प्रमाणात पाणी प्या. त्यामुळं तुम्हाला असे त्रास होणार नाहीत आणि तुमचे आरोग्य चांगले राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *