कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका: MSRTC ने लाल परी संदर्भात घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । येत्या काळात कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government), आरोग्य विभागाने पूर्व तयारी केली आहे. यासोबतच आता राज्य परिवहवन महामंडळाने (MSRTC) सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एमएसआरटीसी आपल्या जवळपास 10 हजार बसेसवर अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग (antimicrobial chemical layer) करणार आहे. म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर आणि बसेसच्या आतमध्ये सुद्धा ही फवारणी करण्यात येणार आहे. या फवारणीमुळे कोणत्याही प्रकारचा विषाणू, रोगजंतू गाडीवर आणि गाडीच्या आतमध्ये राहणार नाही. अशा प्रकारच्या रसायनिक फवारणींचा उपयोग अनेक कार्यालये आणि एअरलाईन्समध्ये केला जातो.

एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले की, “कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक हे सार्वजनिक परिवहनचा उपयोग करणं टाळत आहेत. त्यामुळे एसटी बसेसवर करण्यात येणारी ही रसायनिक फवारणी प्रवाशांमधील भीती नक्कीच दूर करण्यास मदत करेल.”

अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग ही रासायनिक फवारणी बसेसच्या खिडकी, सीट, चालकाची केबिन, दरवाजे यासोबतच प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या जवळपास सर्वच भागांत केली जाणार आहे. या संदर्भातील प्रक्रियेसाठी मे महिन्यात निविदा काढण्यात आल्या होत्या आणि दोन कंपन्यांनी पुढील आठवड्यात या प्रक्रियेची सुरुवात करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *