पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं पानशेत धरण 95 टक्के भरलं,: खडकवासला धरण ओव्हरफ्लो

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । पुणे जिल्ह्यात (Pune Rain) यंदा चांगला पाऊस झाला आहे. पुण्यातल्या धरणक्षेत्रातही पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पुण्यातील पानशेत (Panshet Dam) धरण 95 टक्के भरलं आहे. पानशेत धरण हे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक आहे. पुणेकरांना थोडीफार का होईना पाणीकपातीपासून (Water Cut) दिलासा मिळाला आहे.

धरणात 10.11 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पानशेत धरणातून पॉवर हाऊसमधून 600 क्युसेकनं पाणी सोडण्यात येतेय. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणात 1.97 टीएमसी इतकं पाणी आहे. वरसगाव धरण 85 टक्के भरले असून धरणात 10.86 टीएमसी इतके पाणी आहे. टेमघर धरणात 75 टक्के पाणीसाठा आहे. या धरणात 2.76 टीएमसी पाणीसाठा आहे.

गेल्या आठवड्यात खडकवासला धरण (Khadakwasla Dam) तुडूंब भरल्याने अवघ्या 7 तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग (Water discharge from Dam) 2400 क्युसेकवरून 25036 पर्यंत वाढवत न्यावा लागला होता. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या (Mutha River) रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

गेल्यावर्षी ऑगष्ट महिन्यात खडकवासला धरण 100 टक्के भरलं होतं. यंदा मात्र तेच धरण 22 जुलैला 100 भरलं. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवस आधीच धरणातून पाणी सोडावं लागलं. खडकवासला प्रकल्पात एकूण 25.71 टीएमसी म्हणजेच 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *