पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार ; पीएफ खात्यात जमा होणार पैसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांचे डोळे लागून राहिलेले पीएफवरील व्याजाचे पैसे अखेर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे ऑगस्ट महिन्यात नोकरदारांच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला हे पैसे नोकरदारांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीवर (PF) वाढीव व्याजासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 2020-21 आर्थिक वर्षासाठी पीएफच्या रक्कमेवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. वाढलेल्या व्याजासह पीएफची रक्कम आता नोकरदारांच्या खात्यात जमा होईल.

तसेच सध्या कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने कर्मचाऱ्यांना एक नवी सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

युएएनशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढणे देखील शक्य आहे. यासाठी तुम्हाला पीएफ काढण्याचा फॉर्म भरावा लागेल आणि तो स्थानिक पीएफ कार्यालयात जमा करावा लागेल. ईपीएफ सदस्याला एकतर आधारवर आधारीत समग्र क्लेम फॉर्म किंवा नॉन-आधार समग्र क्लेम फॉर्म इंटरनेटद्वारे डाउनलोड करावा लागेल. आपण हा फॉर्म भरून पीएफ खात्यातून अंशतः किंवा पूर्ण पैसे काढू शकता. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास किंवा कर्मचारी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बेरोजगार असेल तरच पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढता येतात. त्याचप्रमाणे, एका महिन्यासाठी बेरोजगार झाल्यास, ईपीएफ सदस्य त्याच्या एकूण पीएफ रकमेपैकी 75 टक्के रक्कम निवृत्तीवेतनातून काढू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *