आठवडाभरात चार IPO बाजारात; जाणून घ्या कोणती कंपनी किती शेअर्सची विक्री करणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । भांडवली बाजारातील तेजी आणि गुंतवणूकदारांचा समभाग विक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता भांडवल उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांनी गर्दी केली आहे. या आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात धडकणार असून त्यातून ३६०० कोटींचे शेअर विक्री केले जाणार आहेत.

येत्या बुधवारी ४ ऑगस्ट २०२१ रोजी चार कंपन्यांचे आयपीओ विक्रीसाठी खुले होणार आहेत. यात विंडलास बायोटेक, देवयानी इंटर्ननशनल, क्रस्ना डायग्नॉस्टीक आणि एक्झारो टाईल्स या कंपन्या समभाग विक्री करणार आहेत. यातून एकूण ३६१४ कोटींचे भांडवल उभारले जाणार आहे. ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे.

क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा
चालू आर्थिक वर्षात जवळपास १२ कंपन्यांनी भांडवली बाजारातून २७००० कोटींचे भांडवल उभारले आहेत. त्याचबरोबर डझनभर कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. प्राथमिक बाजार तेजीत असल्याने ग्रे मार्केटमध्ये कंपन्यांच्या शेअरला चांगला प्रीमियम मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

विंडलास बायोटेकची समभाग विक्री
देहरादूनच्या विंडलास बायोटेक ४०२ कोटीचा आयपीओ जाहीर केला आहे. यासाठी प्रती शेअर ४४८ ते ४६० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ३० शेअरसाठी अर्ज करता येईल. उत्पादन क्षमता वाढवणे, नवीन मशिनरी खरेदी आणि कर्ज फेडीसाठी या भांडवलाचा उपयोग केला जाणार आहे.

देवयानी इंटरनॅशनल
केएफसी, पिझ्झाहट, कोस्टा काॅफी या खाद्यपदार्थ विक्रेत्या कंपन्यांची फ्रान्चायझी असलेल्या देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड भांडवली बाजारात समभाग विक्रीची घोषणा केली आहे. कंपनीकडून बुधवार ४ ऑगस्ट २०२१ पासून इक्विटी शेअर्समची पब्लिक ऑफरिंग सुरु करणार आहे. ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर ८६ ते ९० रुपये हा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १६५ शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे.

क्रस्ना डायग्नोस्टीक (Krsnaa Diagnostics)
क्रस्ना डायग्नोस्टीक ४०० कोटींचे शेअर विक्री करणार आहे. यासाठी प्रती शेअर ९३३ ते ९५४ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वीच कंपनीने १२१३ कोटी अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले आहेत. ग्रे मार्केटमध्ये Krsnaa Diagnostics च्या शेअरला ४१० ते ४२० प्रीमियम मिळत आहे. कंपनी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये नवीन डायग्नोस्टीक सेंटर उभारणार आहे.

एक्झारो टाइल्स लिमिटेडची समभाग विक्री
व्हिर्ट्रिफाइड टाइल्सच्या क्षेत्रातील एक आघाडीचे उत्पादक असलेल्या गुजरातमधील एक्झारो टाइल्स लिमिटेडने भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. कंपनीची समभाग विक्री बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी खुली होणार असून शुक्रवारी ०६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. या ऑफरसाठी ११८ ते १२० हा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनी समभाग विक्रीतून १६१ कोटी उभारणार आहे. किमान १२५ शेअरसाठी बोली लावता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *