छोटा राजनच्या नाक, तोंडातून रक्त आले; तिहार जेलमध्ये जिवाला धोका?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली : तिहारच्या तुरुंगामध्ये कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या बाबतचा आरोप त्याच्या वकिलाने अनेकदा केलेला असला तरीही त्य़ावर विश्वास ठेवण्यासारखी घटना समोर आली आहे. छोटा राजनच्या नाक आणि तोंडातून रक्त वाहत आहे. हा प्रकार कशामुळे होतोय याबाबत समजले नसले तरीही असे अनेकदा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तुरुंगातील सुत्रांनुसार राजनला गेल्या वर्षी दोनदा ही समस्या झाली होती. आजची ही घटना कळताच तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. मात्र, याबाबत काही समोर आलेले नाही. मात्र, तिहार जेलमध्ये राजनची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याला गेल्या पाच-सहा महिन्यांपासून खोकला, ताप येत आहे. यामुळे राजनला नीट जेवताही येत नाही की झोपताही य़ेत नाहीय.झोपण्यापूर्वी राजन केवळ कफ सिरप पित आहे. तसेच अन्य़ आजारांच्या गोळ्याही त्याला रोज देण्यात येत आहेत. त्याचे जेवणही कमी करण्यात आले आहे. तसेच डी कंपनीद्वारे राजनची हत्या करण्याची माहितीही मिळाली होती. यामुळे राजनच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. त्याला सुरुवातीपासूनच तिहेरी कड्याची सुरक्षा व्य़वस्था देण्यात येत आहे. तसेच काही काळाने त्याच्या सुरक्षेतील जवानांचीही बदली केली जाते. यावर तिहार जेलच्या अधिक्षकांनी सांगितले की, राजनची तब्येत ठीक आहे. त्याची रोजचे रोज तपासणी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *