दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाची सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । येत्या दसऱ्याला (Dussehra) म्हाडाच्या घरांची (Mhada Lottery 2021) लॉटरी काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या लॉटरीमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरं असणार आहे. एकूण 9 हजार घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Konkan board ) याबाबतची जाहिरात देखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांच्या लॉटरीची सोडत काढली जाणार आहे.

या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6500 घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2000 घरे आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाचे कोकण मंडळ 9000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्यानं सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निम्न आणि मध्यम वर्गीयांसाठी ही घर असतील. ही घरं ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत. मीरा रोडमध्ये मध्यम वर्गीयांसाठी 2 बीएचके 196 घरं असतील. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 67 दुकानं उपलब्ध करून दिली जाणार असून त्यांची किंमत जवळपास 38 लाख ते 40 लाखांच्या घरात असतील.

कोकण मंडळाच्या लॉटरीद्वारे ठाण्यातील वर्तकनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे उपलब्ध असतील. या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट इतके असेल. या घरांची किंमत 38 ते 40 लाख इतकी असणार आहे. त्यानंतर वडवली येथे 20, कासारवडवली 350 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असतील. या घरांची किंमत 16 लाखांच्या जवळपास असेल. विरार येथे 1 हजार 300 घरे उपलब्ध असणार आहेत. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *