केंद्र सरकारचा राज्य सरकारला अलर्ट ; पुढील 15 दिवस धोक्याचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । कोरोनाची Corona तिसरी लाट आता येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये आता देशात सणासुदीचा काळ देखील सुरू झाला आहे. यामुळे देशामधील कोरोनाची परिस्थिती भयंकर होण्याची शकयता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने राज्य सरकारला सावध केले आहे.

19 ऑगस्टपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस खूप धोक्याचे राहणार आहेत. हे 15 दिवस अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आले आहेत. या दिवसात कडक निर्बंध Restrictions लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने Central Government सर्व राज्यांना दिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. ज्यामध्ये सणासुदीचा कालावधीचा काळ लक्षात घेता राज्यांना काही निर्देश देण्यात आले आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार या कालावधी मध्ये सण, उत्सव लक्षात घेता जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळामध्ये गर्दी जमा होणार नाही. याची दक्षता राज्यांना घ्यावी लागणार आहे. कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे. राज्यांनी स्थानिक स्तरांवर आवश्यक तेवढे निर्बंध लागू करावे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होणार नाही. एक छोटीशी चूक देखील संसर्ग पसरण्याचे मोठे कारण ठरू शकणार आहे.

या महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे देशात दिवसभरात जवळपास 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. बिकट परिस्थिती मध्ये हा आकडा अडीच लाख इतका वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेली कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात अतिशय भयंकर राहणार आहे.

यामुळे या वर्षी देखील गणपती आणि दिवाळी कोरोना विषाणूच्या सावटाखाली असणार असल्याची माहिती समजली जात आहे. दुसऱ्या लाटे मध्ये आरोग्य यंत्रणेची झालेली अवस्था बघता, तिसरी लाट देखील असचं थैमान घातले तर देशापुढे अनेक मोठे संकट आणि समस्या निर्माण होऊ शकणार आहे. हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीमधील संशोधक मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या मध्ये गणितीय मॉडेलचा वापर करून, देशात कोरोना स्थिती काय असणार आहे, याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *