तब्बल एक हजार जण एकाच वेळी बोलू शकतील ; टेलिग्रामने आणले जबरदस्त फिचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । सध्याच्या टेलिग्राम या इंस्टंट मेसेजिंग अॅपची लोकप्रियता वाढत असून जगभरात सध्या टेलिग्रामचे 500 दशलक्षाहून अधिक युझर्स आहेत. यापैकी 300 दशलक्ष युझर्स गेल्या तीन वर्षात टेलिग्रामशी जोडले गेले आहेत. टेलिग्रामकडून वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर युझर्संना अधिकाधिक फीचर्स देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून विद्यमान युझर्स टेलिग्रामवर राहतील, तसेच नवीन युझर्स देखील जोडले जातील.

टेलिग्रामने नुकतेच त्याच्या युझर्ससाठी व्हिडीओ कॉलचा एक नवा अफलातून फिचर आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी तब्बल एक हजार लोकांशी एकाचवेळी जोडले जाऊ शकता. टेलिग्रामवर सिंगल व्हिडिओ कॉल तसेच ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतात. टेलिग्रामवर यापूर्वी ग्रुप व्हिडिओ कॉलची मर्यादा फक्त 30 लोकांची होती. म्हणजेच एका वेळी फक्त 30 लोक व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकत होते. पण टेलिग्रामच्या नव्या अपडेटमुळे युझर्संना एक नवीन आणि भन्नाट फिचर प्रदान केले आहे.

आता टेलिग्रामची व्हिडिओ कॉल मर्यादा या नवीन फीचरच्या मदतीने 30 लोकांकडून 1000 लोकांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आता तब्बल 1000 लोक टेलिग्रामच्या व्हिडिओ कॉलचा भाग बनू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *