विठ्ठ्ल मंदिर फुलांनी सजले, सावळ्या विठुरायाचं लोभस रुप ; पहिला श्रावणी सोमवार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना….! आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.


ही सजावट मुंबई येथील विठ्ठल मंजुळा हुन्नुर यांनी केलीय… सजावटीनंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं सावळे सगुण रुप पाहायसा मिळत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी,चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागाना शेवंती, ग्लेंडर, निळ्या रंगाचा ब्ल्यू डिजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, ड्रेसिना,ऑर्केड अशा विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.

यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे. भक्तांना थेट मंदिरात दर्शनाची परवानगी नसली तरी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली आहे. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *