महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट ।आज श्रावणी सोमवार असला तरी भक्तांना मंदिरात जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेता येणार नाही. कारण कोरोनामुळं राज्यातल्या मंदिराचे दरवाजे अजूनही बंदच आहेत.. प्रत्येक श्रावणात त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मोठी गर्दी होते. मात्र यंदा प्रशासनानं तिथं संचारबंदी लागू केली आहे… रविवारी रात्री ८ ते सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथं संचारबंदी असेल… ब्रह्मगिरी प्रदिक्षणेवर देखील बंदी असणार आहे.. दरम्यान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडा अशी मागमी पुरोहित संघाकडून करण्यात येतेय.