महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । थर्माकोलचा साइड इफेक्ट्स तुम्हाला माहीत आहेत का? प्लास्टिक जेवढे धोक्याचे आहे, तेवढेच थर्माकोलचा कपही धोक्याचे आहेत. हे पुढे जाऊन कॅन्सरसारख्या आजाराचे कारणदेखील बनू शकतात. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला थर्माकोलपासून बनलेल्या वस्तुंमधून खाद्यपदार्थ खाल्ल्यास काय समस्या उद्भवू शकतात याची माहिती देणार आहोत.
थर्माकोलच्या डिस्पोझेबलचे नियमित वापरामुळे पोट खराब देखील होऊ शकते, कारण हे पूर्णपणे हायजिनिक नसतात. यात गरम वस्तू टाकल्यानंतर यात उपस्थित बॅक्टेरिया यात विरघळतात आणि शरीरात पोहचतात. तुम्ही जर नियमित रूपाने प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या कपात चहा, कॉफी किंवा गरम पदार्थांचे सेवन करत असाल आणि तुम्हाला अॅलर्जी झाली तर याचे मुख्य कारण हे कप असू शकतात. तुमच्या बॉडीवर यामुळे रॅशेज येऊ लागतील आणि हे हळूहळू जास्त प्रमाणात वाढू लागतात. थर्माकोलच्या वापरामुळे झालेल्या अॅलर्जीचे मुख्य कारण गळ्यात दुखणे यापासून सुरू होते.
याबाबत विशेषज्ञांचे मानले तर पॉलिस्टिरीनपासून थर्माकोलचे कप बनलेले असतात, आपल्या आरोग्यासाठी जे फारच नुकसानकारक आहे. अशात हे गरजेचे आहे की जेवढे होऊ शकते याचा वापर कमीत कमी करावा. जेव्हा आपण थर्माकोलच्या कपात गरम चहा घालून पितो तर याचे काही तत्त्व गरम चहात मिसळून पोटात जातात आणि हे शरीरात जाऊन कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देतात. तुम्हाला या कपात उपस्थित स्टाइरीनमुळे थकवा, अनियमित हार्मोनल बदल, शिवाय अजूनही बऱ्याच समस्या येऊ शकतात.
थर्माकोलद्वारे हे कप तयार केले जातात आणि चहा किंवा खाण्याचे सामान बाहेर निघू नये म्हणून यावर वॅक्सचा थर चढवण्यात येतो. आपण जेव्हा चहा किंवा कॉफीचे सेवन करतो, तर त्यासोबत वॅक्सदेखील आपल्या बॉडीत जातो. यामुळे आतड्यांची समस्या आणि इन्फेक्शन होण्याचे धोके वाढून जातात आणि याचा प्रभाव आमच्या पचन तंत्रावरदेखील पडतो.