महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट ।
मेष- व्यावसायाची सुरुवात होईल. आज कामं नियोजनानुसार करा. आज आपली चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मत्र प्रवास टाळा.
वृषभ- आज हिंमत हरू नका संयम ठेवा. समोर येणाऱ्या परिस्थितीत गाफील न राहता पडताळून पाहा. कोणावरही थेट विश्वास ठेवण्याच्या आपल्या स्वभावामुळे अडचणीत सापडू शकता.
मिथुन- शेवटच्या क्षणी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आज आपण तणावातून मुक्त व्हाल. आज आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला जाणार आहे. गरज नसल्यास प्रवास टाळा.
कर्क- आज आपल्या करियरमध्ये चांगले परिणाम आपल्याला मिळतील. आपल्याला कठोर परिश्रमांशिवाय कुठेच पर्याय नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आज संभ्रम असेल. आत्मविश्वास ढळू देऊ नका.
सिंह- आज दिवस उत्तम आहे . आरोग्य चांगले राहील . वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्याकडे आज आपला कल असेल. आपल्या विनम्र स्वभावामुळे आपल्याला यश मिळेल.
कन्या- आज दिवस चांगला आहे . आज आपण करत असलेल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हाल. आपल्या सगळ्या इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होतील. घरीच राहणं पसंत करा
तुळ- आपला आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक- आज दिवस चांगला जाईल , आर्थिक लाभ संभवतो , आरोग्य उत्तम असेल , व्यवसायातील अडचणी आज दूर होतील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येईल.
धनु- आज दिवस ठीक आहे . मनाची चल बिचल अवस्था असेल भावनिक संभ्रम असणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना गडबड करू नका. आत्मविश्वास कमी करू नका.
मकर- आज व्यवसायात यश मिळणार , आर्थिक लाभाचे योग आहे . आज आपली लोकप्रियता वाढेल. व्यावसायाच्या निमित्तानं आज प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ- आज दिवस चांगला जाईल , व्यवसायात यश संभवते . आरोग्य उत्तम राहील आर्थिक गोष्टी आज आपल्या पूर्ण होतील. आज आपल्याला फायदा मिळेल.
मीन- आज आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रवास टाळा. आरोग्य ठीक असेल. कोणतीही गुंतवणूक करतांना घाई करू नका . आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा .