WhatsApp वर लवकरच येणार हे नवीन फिचर ; चॅटिंग करायला आता आणखी मजा !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । व्हॉट्सॲप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप (Messaging App) आहे. मित्र, कार्यालयीन सहकारी, नातेवाईकांशी कनेक्ट राहून संवाद साधण्यासाठी, शेअरिंगसाठी प्रामुख्याने व्हॉट्सॲप वापरले जाते. व्हॉट्सॲपची तशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्यातील इमोजी (Emoji) हे एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मेसेज टाइप करण्यापेक्षा अनेक युजर्स या इमोजींचा (Emoji) प्राधान्याने वापर करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक इमोजी खूप लोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे ही बातमी इमोजी चाहत्यांसाठी महत्वाची आहे. कारण व्हॉट्सॲपने लेटेस्ट इमोजी पॅकचा समावेश करण्यास सुरुवात केली असून, अॅण्ड्रॉईड (Android) अॅपच्या बीटा बिल्डमध्ये (Beta) या नव्या इमोजींचा समावेश केला जात आहे. हे नवे इमोजी अधिक आकर्षक आणि वैशिष्टपूर्ण असतील. यशस्वी बीटा रोलआऊटनंतर, व्हॉट्सॲप मेसेजिंग अधिक रोमांचक आणि आकर्षक करण्यासाठी हे नवे इमोजी लवकरच सार्वजनिक वापरात आणले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या इमोजींमध्ये फायर हार्ट (Fire heart), दाढी असलेले चेहरे आणि अनेक किसिंग इमोजींचा (Kissing Emoji) समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे अॅपलनेदेखील नव्या अपडेटसह नवे इमोजी पॅक सादर केलेले आहे.

 

या नव्या इमोजी सपोर्ट व्यतरिक्त व्हॉट्सॲप मेसेजिंग प्लॅटफॉर्मला अधिक सोपं आणि आकर्षक बनवण्यासाठी अनेक नवी फिचर्स आणि सुविधांवर काम करत आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर व्हॉट्सॲपने नुकतच डिसअॅपियरिंग मेसेज (Disappearing Message) हे नवं फिचर सादर केलं आहे. याशिवाय मल्टी डिव्हाईस सपोर्टसाठी (Multi Device Support) व्हॉट्सॲप काम करत आहे. यामुळे युजर्सला हे अॅप एकापेक्षा अधिक डिव्हाईसवर वापरता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपने अॅण्ड्राईडसाठी लेटेस्ट व्हॉट्सॲप बीटामध्ये काही नवे इमोजी समाविष्ट केले आहेत. हे व्हर्जन 2.21.16.10 असे आहे. जे युजर्स व्हॉट्सॲपचा बीटा प्रोग्राम वापरतात, त्यांना या नव्या इमोजी पॅकचा वापर करता येणार आहे. जर तुम्ही बीटा व्हर्जन वापरत असाल आणि तुम्ही एखादा इमोजी दुसऱ्या युजरला सेंट केला तर तो युजर जर बीटा व्हर्जन वापरत नसेल तर त्याला तो इमोजी दिसणार नाही. व्हॉट्सॲपच्या अॅण्ड्रॉईड बीटा व्हर्जन व्यतरिक्त अॅपलने (Apple) नुकतेच आयओएस (iOS) 14.5 या नव्या अपडेटसह नवा इमोजी पॅक (Emoji Pack) सादर केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *