रेस्टॉरंटवरील निर्बंध हटणार?; टास्क फॉर्सनं दिले महत्त्वाचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । रेस्टॉरंट व हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. याबद्दल हॉटेल व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यासंबंधी आता राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

रेस्तराँवरील निर्बंध कमी करण्यासंबंधी टास्क फोर्सशी चर्चा करावी, अशी मागणी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (हारवी) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी याविषयी टास्क फोर्सशी चर्चा केली आहे व टास्क फोर्स याबाबत सकारात्मक आहेत, असे असोसिएशनने म्हटले आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी सांगितले की, ‘रेस्टॉरंटवरील निर्बंध कमी करण्याबाबत शिफारस केल्याबद्दल डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सचे आभार आहेत. आदरतिथ्य क्षेत्रासाठी गेले काही महिने खूपच खडतर होते. त्यामुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी हा मोठा दिलासा आहे. आता व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.’

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *