IND vs ENG: टीम इंडियासाठी लॉर्ड्सची लढाई अवघड, या खेळाडूंची कामगिरी निराशजनक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरु होणार आहे. लॉर्ड्सचं ऐतिहासिक मैदान टीम इंडियाच्या बॅट्समनसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर हे दिग्गज लॉर्ड्सवर फार यशस्वी झालेले नाहीत. विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचीही अशीच अवस्था आहे. टीम इंडियातील प्रमुख बॅट्समनची लॉर्ड्सवरील कामगिरी कशी आहे पाहू या .

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 27 सेंच्युरी केल्या आहेत. त्यापैकी एकही सेंच्युरी लॉर्ड्सवर नाही. विराटनं लॉर्ड्सवरील 4 इनिंगमध्ये फक्त 65 रन काढले आहेत. विराटला यामध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. 25 हा त्याचा बेस्ट स्कोर आहे. (फोटो : AFP)टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराचीही लॉर्ड्सवरील कामगिरी निराशाजनक आहे. पुजारानं लॉर्ड़्सवरील दोन टेस्टमध्ये 89 रन काढले आहेत. विराटप्रमाणे त्यालाही अर्धशतक झळकावण्यात अपयश आलंय. लॉर्ड्सवर पुजाराचा बेस्ट स्कोअर 43 आहे.

केएल राहुल देखील लॉर्ड्सवर फ्लॉप ठरलाय. राहुलनं 2018 साली लॉर्ड्सवर टेस्ट मॅच खेळली होती. त्यामधील दोन इनिंगमध्ये त्यानं 18 रन काढले होते.टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं लॉर्ड्सवर शतक झळकावलं आहे. रहाणेनं 2014 साली या मैदानात 103 रनची खेळी केली होती. त्याच्या शतकामुळे टीम इंडियानं ती टेस्ट 95 रननं जिंकली होती. टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी या मैदानावर एकही टेस्ट आजवर खेळलेली नाही. गुरुवारपासून सुरु होणारी टेस्ट या दोघांची लॉर्ड्सवरील पहिलीच टेस्ट असेल.

टीम इंडियानं लॉर्ड्सवर 18 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी फक्त 2 टेस्ट जिंकल्या असून 12 मध्ये पराभव झाला आहे. अन्य 4 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *