दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती ? ; आहार तज्ज्ञ देतात हाच सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । चुकीच्या वेळी जेवण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम (Eating at Wrong Time can have Serious Health Consequences)होत असतात. जशी सकाळच्या वेळी नाश्त्याची (Morning Breakfast) शरीरालासाठी आवश्यक असतो. तसाच ठराविक वेळी दुपारचं जेवणही(Lunch) महत्त्वाचं असतं. दुपारचा आहार योग्य पोषण(Nutrition)देणारा आणि ऊर्जा निर्माण करा असावा. यासाठी ठराविक वेळ जेवण घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टनी दुपारी योग्य वेळी जेवण करण्यास सांगितलं आहे.

आहार तज्ज्ञांच्या मते दुपारच्या जेवणाची वेळ ही 11 ते 1 या दरम्यान आहे. यावेळी दुपारी जेवणं शक्य नसेल तर, काय करावं हा प्रश्न असेल तर, त्याचही उत्तर त्यांनी दिलं आहे. कामाच्या गडबडीत ऑफिसमध्ये आपल्या 11 ते 1 च्या दरम्यान जेवणं शक्य नसतं. अशा वेळेस या काळात किमान 1 केळं खावं आणि वेळ मिळताच जेवण घ्यावं. यामुळे अ‍ॅसिडिटी आणि डोकेदुखी होणार नाही असं त्या सांगतात.

दिवसभरात 3 वेळा आहार घेणं आवश्यक असतं. दुपारच्या जेवणामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि व्हिटॅमिन असणं आवश्यक आहे.
वेळेवर दुपारचं जेवण केल्यामुळे शारीरिक ताकद आणि एनर्जी मिळते. दुपारी जेवल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि फोकस वाढतो. मेटाबॉलिझम सक्रिय राहतो. दुपारच्या जेवणामध्ये असलेले पोषक घटक आपल्याला आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *