महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । मुंबईतील लोकल रेल्वेचे नियम पुणे लोकललाही लागू होणार आहेत. पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमू प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार आहे. प्रवाशांना आवश्यक असलेला फोटोपास पोलीस प्रशासनाकडून दिला जाणार आहे. दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेले प्रवाशी पोलिसांकडे पाससाठी अर्ज करू शकतील. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबतचा निर्णय प्रवाशांची संख्या विचारात घेऊन घेतला जाणार आहे.