महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले नियम कमी- जास्त प्रमाणात मागील काळात शिथिल करण्यात आले होते. त्यातच आता आणखी शिथिलता देत नागरिकांच्या मागण्यांचाही विचार राज्य शासनानं पुन्हा एकदा केला आहे. ज्याअंतर्गत राज्यात लागू असणाऱ्या दुकानांच्या वेळा, हॉटेल व्यवसाय यांसंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत.
राज्यात 15 ऑगस्टपासून काय सुरु, काय बंद ?
– हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम, मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार
– सदर आस्थापना 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
– खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाहसोहळ्यांसाठी 200 जणांना परवानगी
– बंदिस्त सभागृहात होणाऱ्या विवाहसोहळा समारंबांसाठी सभागृहाच्या 50 टक्के उपस्थितांची संख्या
– सभागृहातील विवाहसोहळ्यांसाठी 100 हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती नकोच
– खासगी कार्यालयांमध्ये शिफ्ट ड्युटीमध्ये काम करत कार्यालयं 24 तास सुरु ठेवता येतील
– नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळं बंद
– इनडोअर गेम्ससाठी लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मान्यता
– हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेल्यांना वेटींग कालावधीत मास्क घालणं बंधनकारक, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणं आवश्यक.