![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत १ टक्का आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या आणि एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राज्यात राबविणार असल्याचेही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कोरोना माहामारी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. कोरोना निर्बंधांबाबत आणखी शिथिलता आणि पूरग्रस्तांसाठी मदत यांसाऱख्या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.