ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडच्या यशाचे रहस्य…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । इंग्लंडने टोकियो ऑलिम्पिकमध्ये २२ सुवर्णांसह ६५ पदके जिंकत चौथे स्थान मिळवले. तो २००८ मध्येदेखील चौथ्या स्थानी होता. तेव्हा तो आपल्या बरोबरीचे देश जसे इटली (नवव्या), फ्रान्स (दहाव्या), स्पेन (१४ व्या) यांच्यापेक्षा खूप पुढे होता. २०१२ लंडनमध्ये इंग्लंड तिसऱ्या आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला. टोकियोतील यशात सर्वाधिक योगदान त्याच्या सायकलपटू व जलतरणपटूंचे राहिले. सायकलिंगमध्ये इंग्लंडने ६ सुवर्णांसह १२ पदके जिंकली. इंग्लंड या खेळात टोकियाेत सर्वात यशस्वी देश ठरला. दुसरीकडे, जलतरणात त्यांनी ४ सुवर्णांसह ८ पदके मिळवली. इंग्लंडची ही ऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. इंग्लंडने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ४८० मिलियन डॉलर (३५७०० कोटी रुपये) खर्च केले.

इंग्लंड जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. यासाठी त्यांनी निवडीचे धोरण बदलले. पूर्वी इंग्लंड ऑलिम्पिक संघटना ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचे नामांकन करत असे. यंदा टोकियो ऑलिम्पिकच्या निवडीसाठी एप्रिलमध्ये इंग्लंड जलतरण स्पर्धा लंडनमध्ये घेतली. यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जलतरणपटूंना ऑलिम्पिकला पाठवले. या वेळी ज्या खेळांवर सर्वाधिक खर्च केला त्यात यश मिळाले.

इंग्लंडमध्ये हे परिवर्तन १९९६ अटलांटा ऑलिम्पिकनंतर झाले तेव्हा त्यांना केवळ १ सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर सरकारने काही निवडक खेळांवर लक्ष्य देण्याचा निर्णय घेतला. ज्या खेळात पदकाची शक्यता अधिक त्या खेळांची निवड केली. सरकारने अशाच खेळांना प्राधान्य देणे व त्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हे खेळ होते सायकलिंग, रोइग, सेलिंग आदी. सायकलिंगमध्ये इंग्लंड गत ४ ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी देश आहे. दुसरीकडे, सेलिंगमध्येदेखील सर्वाधिक (३१) पदके जिंकली. सरकारने अव्वल खेळाडूंना लाॅटरी पद्धतीने निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत “नो कॉम्प्रॉइझ अॅप्रोच’ लागू केला गेला. म्हणजे “पदक नाही, काहीही नाही.’

बर्कशायरमधील इंग्लिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट््सच्या बिशम अॅबे तळावर इंग्लंडच्या खेळाडूंनी जपानसारखे वातावरण बनवून तयारी केली. ३५ डिग्री सेल्सियस तापमान आणि ६०% आर्द्रता असलेले उष्णता कक्ष बांधण्यात आले, जेणेकरून खेळाडू ऑलिम्पिकदरम्यान जपानच्या उष्णतेशी जुळवून घेऊ शकतील. जुलै-ऑगस्टदरम्यान जपानमधील तापमान ३५ डिग्रीच्या जवळपास पोहोचते आणि तेव्हा इंग्लंडचे तापमान २१ डिग्री असते. या उष्मा कक्षात घोडेस्वार संघासाठी यांत्रिक घोडे व तिरंदाजांसाठी टार्गेट बनवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *