पुण्यातील गणेश मंडळाचे एकमत ; गणेशोत्सवात साधेपणा, सामाजिक उपक्रमावर भर देण्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आपण जवळचे लोक कोरानाच्या दुसऱ्या लाटेत गमावले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन भर देत तसेच सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला जाईल, अशी भूमिका अनेक मंडळांनी घेतली आहे. पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सव पूर्वतयारी २०२१ या मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळांच्या अध्यक्षांनी आपली मते मांडली आहेत.

सर्वच गोष्टींवर मागील दीड वर्षात बंधने आली आहेत. कोरोनाबाबत जनजगृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळांना झिरो बजेट कार्यक्रम द्यावेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी असेही ते म्हणाले आहेत. अवघ्या ३० दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. वैभवशाली उत्सवावर कोरोनाचे सावट अद्यापही कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंडळांची बैठक घेण्यात आली होती. गणेश मूर्ती विर्सजनावर या बैठकीत महत्वाची भूमिका मांडली.

कार्यकर्ते म्हणाले, महापालिकेने मूर्तिदान या उपक्रमाचा विचार करावा. त्यांचे स्टोरेज करण्याची तयारी करावी. तसेच लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. शहरातून साडे चार लाख मूर्ती विसर्जन होत असतात. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणारच आहे. पण असंख्य कार्यक्रम, शिबिरे हि जर ऑनलाइनच्या माध्यमातून राबवली आणि गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. तरी युट्यूब, फेसबुकवर हे कार्यक्रम वर्षानुवर्षे राहतात. त्यानुसार या कार्यक्रमांवर भर द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *