महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । औरंगाबाद Aurangabad आणि पुणे Pune या दोन शहरातलं अंतर कमी व्हावं असं औरंगाबादकरांना नेहमी वाटतं. मराठवाड्यातील इतर जिल्हे औरंगाबादशी कनेक्ट असल्यामुळे त्यांनाही पुणे जवळ होईल. औरंगाबाद-पुणे या दोन शहरातले अंतर कमी झाले तर मराठवाड्याच्या विकासाला अधिक गती येईल; राज्याची राजधानी मुंबईजवळ Mumbai होईल अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त होत आहे हीच मागणी घेऊन औरंगाबादच्या उद्योजकांनी दिल्लीमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी NItian Gadkari यांच्या भेट घेतली. औरंगाबाद ते पुणे ‘सुपर फास्ट वे’ तयार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील उद्योजकांच्या मासिआ या उद्योजक संघटनेचे शिष्टमंडळाने निवेदन दिले.
औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद हे जगाच्या नकाशावर आहे. चार मोठ्या एमायडीसीसोबतच नव्याने सुरू झालेल्या डीएमआयसीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासंदर्भात पाऊल टाकले आहे. औरंगाबाद- पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा ‘सुपर फास्ट वे’ करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती घेतली. सोबतच विकासाच्या मार्गाबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच प्रस्ताव तयार केला जाईल असेही आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याने काही वर्षात औरंगाबाद पुण्याचे अंतर कमी होईल अशी शक्यता वाटू लागली आहे.