महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । पावसाळा आणि आजारपण हे समीकरण ठरलेलं असतं. या काळामध्ये मच्छर चावल्यामुळे मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया झिका व्हायरस सारख्या आजारांचा धोका वाढलेला असतो. याशिवाय तापमानात सतत बदल होत असल्यामुळे सर्दी,खोकला, ताप हे त्रास लहान मुलांना होतात. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलं आजारी पडणार नाही याची जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे. याशिवाय तापमानात सतत बदल होत असल्यामुळे सर्दी,खोकला, ताप हे त्रास लहान मुलांना होतात. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलं आजारी पडणार नाही याची जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात मुलांना आजारपणापासून वाचवणं कठीण असलं तरी काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही मुलांना इन्फेक्शनपासून दूर ठेवू शकता. आपण उन्हाळ्यात गर्मीपासून वाचण्यासाठी मुलांना सुती कपडे घालतो. पण, पावसाळ्यातही मुलांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या काळामध्ये अचानक पाऊस पडल्यामुळे थंड वातावरण निर्माण होतं. पाऊस थांबल्यानंतर गरम होऊ लागतं. या तापमान बदलाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. शिवाय पावसाळ्यामध्ये मच्छर वाढलेले असतात. त्यामुळे मच्छर चावल्यानंतर होणारे आजारही होऊ शकतात. या करता मुलांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्या पावसाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे वापरावेत.
या काळात मच्छरांची वाढ इतर दोन ऋतूंपेक्षा जास्त होते. पावसाचं पाणी एखाद्या ठिकाणी साठल्यामुळे मच्छरांची पैदास होते. त्यामुळे लहान बाळांना अंग झाकणारे पूर्ण कपडे घाला. याशिवाय मुलांना झोपवताना मच्छरदानी मध्येच झोपवा. पावसामुळे गारठा निर्माण झाला तरी लहान मुंलांना अंघोळ घालणं टाळू नका. कोमट पाण्याने त्यांना आंघोळ घालण्याआधी तेलाने मॉलिश करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. अंग स्वच्छ राहिल्यामुळे त्वचेचे विकार होणार नाहीत.