संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केली, अजूनही तीच मागणी करत आहे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल झाली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला आहे.

याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी पीडिताने तक्रार दाखलेल्या प्रतचा फोटोही पोस्ट केला आहे.
त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असंही त्यात म्हटलं आहे.

त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत संजय राठोड यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातोय ??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *