Gold Price Today: पुन्हा वाढले सोन्याचे दर, तपासा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांपासून सोनंचांदीच्या किंमतीत (Gold and Silver Price Today) मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दरम्यान शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi-Commodity Exchange MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 0.19 टक्क्यांनी झालेल्या या वाढीमुळे दर 46,449 रुपये प्रति तोळावर आहेत. सोन्याचे दर या आठवड्याच्या सुरुवातीला चार महिन्यातील निचांकी पातळीवर होते. दरम्यान यामध्ये आठवडाभरात काहीशी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही (Silver Rates Today) वाढ झाली आहे. आज चांदीची वायदा किंमत 0.30 टक्क्यांनी वाढून 62,047 प्रति किलो झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Prices in International Market) शुक्रवारी देखील स्थिर आहेत. स्पॉट गोल्डच्याा किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नसून आज दर 1,752.78 डॉलर प्रति औंस आहेत. या आठवड्यात दर 0.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2% ने वाढून 1,754.40 डॉलर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *