अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज पासून; प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । देशासह राज्यातील शिक्षण सेवेत कोरोनामुळे अनेक समस्या आणि गोंधळ पाहायला मिळाला. शालेय शिक्षण आणि शिक्षण विभाग दोन दीड वर्षानंतर आता सावरलेला दिसत आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहे.

अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज पासून म्हणजे 14 ऑगस्टपासून सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु होणार आहे.

22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. तर 17 ते 22 ऑगस्टदरम्यान उपलब्ध जागांची माहिती देण्यात येणार आहे. 23 आणि 24 ऑगस्टला मेरिस्ट लिस्ट लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *