महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । विमान प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान भाड्यात १२.५ टक्क्यांची वाढ केलीय. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने भाड्यावरील लोअर आणि अप्परची मर्यादा ९.८३ वरुन १२.८२ टक्क्यांनी वाढवलीय.