महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । कारगील युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांच्या जीवनावर आधारीत नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शेरशाह’ (Sheshaah) हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) अभिनित चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. धाडसी आणि देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. पण विक्रम यांच्या आयुष्यात असा किस्सा घडला होता की ज्यामुळे पाकिस्तानला मोठी धडकी भरली होती.
कॅप्टन विक्रम बत्रांचा भाऊ विशाल बत्रा यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता, जेव्हा विक्रम आणि पाकिस्तानी सैनिकात हे संभाषण घडलं होतं. भारताच्या सिमांवर हल्ला करणाऱ्या एका पाकिस्तानी सैनिकाने माधुरी दीक्षितला मागितलं होतं. त्यावर विक्रम यांनी दिलेल्या उत्तराने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली होती.
https://www.instagram.com/sidmalhotra/?utm_source=ig_embed&ig_rid=9ea903bc-2f22-46f3-a88c-476ec80b24a7
विशाल यांनी सांगितलं की, ‘विक्रम जेव्हा शत्रूंच्या बाजूने वळत होता, तेव्हा त्याच्या रेडियो ला पाकिस्तानी सैनिकांनी इंटरसेप्ट केलं होतं आणि त्याला धमकी देऊ लागले होते. पाकिस्तानी सैनिक म्हणाले होते, ‘अरे शेरशाह, वर नको येऊ नाहीतर तुझी वाईट वेळ आलीच समज.’ यावर विक्रमला फारच राग आला की, ‘हा पाकिस्तानी असून मला धमकी देतोय.’
त्यानंतर विक्रमने त्यांना उत्तर दिलं होतं की, ‘पुढच्या 1 तासात पाहू या टेकडीवर कोण टिकतं.’ तेव्हा एक पाकिस्तानी सैनिक म्हणाला की, ‘आम्ही तुम्हाला आणि हरवू आणि तुमच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना (माधूरी दीक्षितला) घेऊन जाऊ.’ त्यानंतर विक्रम यांनी त्या टेकडीवर तिरंगा फडकवण्याआधी तिथे अगजृदी शांतपणे ग्रेनेड बॉम्ब टाकला. आणि म्हणाला की, ‘तुम्हा सर्वांना माधुरी दीक्षितकडून लहानशी भेट.’ यानंतर संपूर्ण त्यांच्या बखरी बरखास्त करून तिथे तिरंगा फडकावण्यात आला.