महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । राज्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोनाच्या रुग्ण व बळींच्या संख्येत मोठी घट झाली. दिवसभरात 4 हजार 797 नवे रुग्ण आढळले, तर 130 जणांचा मृत्यू झाला. याचवेळी 3,710 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. काही जिह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली.
राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.26 टक्क्यांवर गेले आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्युदर 2.19 टक्के असा नियंत्रणात आहे. आतापर्यंत 61 लाख 81 हजार 933 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 64 हजार 219 इतकी असून मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3,096 पर्यंत खाली आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता पुणे जिह्यात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक 14 हजार 748 इतकी आहे. अनेक जिह्यांमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. नंदुरबार, भंडारा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.