महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले गेले आहे. पेट्रोलियम पंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. मागील साडेआठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल 165.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे.सोमवारी रात्रीपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. त्यानुसार आता मुंबई आणि दिल्लीमध्ये 859.5 रुपये, कोलकात्यात 886 रुपये, लखनौमध्ये 897.5 रुपये अशाप्रकारे घरगुती गॅस सिलिंडरसाठी महागडी किंमत मोजावी लागणार आहे. पेट्रोलियम पंपन्यांनी महिन्यातून दोन ते तीनवेळा गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्याचा धडाका लावला आहे.