महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना त्याचा लाभ ग्राहकांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना चार महिन्यानंतर उपरती झाली आहे. कंपन्यांनी आज बुधवारी डिझेल दरात २० पैशांची कपात केली. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल दर स्थिर ठेवले.
डिझेल दर कपातीने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाचे दर सलग ३० दिवस स्थिर ठेवले होते. आज डिझेल दर कमी झाल्याने मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.२४ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.२० रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८२ रुपये प्रती लीटर इतका खाली आला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४६ रुपये झाला असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये झाला आहे.