बुलढाणा एसटी बसेसच्या फेऱ्या इंधन अभावी रद्द; प्रवाशांची हेळसांड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील 7 आगारात डिझेलची कमतरता भासत असल्याने अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाच्या ST वतीने देण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरापासुन डिझेल मिळत नसल्याने अगोदरच डबघाईस आलेली एसटी शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एसटी सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. कोरोना थोडाफ़ार आटोकयात आल्याने आता कुठे एसटी सुरु करण्यात आली आहे, मात्र एसटीचे उत्पन्न अल्पप्रमाणात येत असल्याने एसटी ला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

तसेच पूर्वी 60 रुपये लीटर डिझेल एसटीला मिळत होते. मात्र आता ते डिझेल 90 रूपयाला मिळत आहे तर टिकिट दर हा 60 रुपये लीटर डिझेलच्या आधारावरच असल्याने एसटीला सेवा देणे परवडत नाही. कारण 90 रुपये लीटर डिझेलच्या भावाने टिकिट दरात वाढ होने अपेक्षित आहे. मात्र तिकितदर वाढ न झाल्याने मोठा आर्थिक फटका एसटीला सहन करावा लागत आहे. त्यांमुळे जिल्ह्यातिल 7 ही आगारातील 50 टक्के बस फेरया रद्द करण्यात आल्या आहेत.

त्याच बरोबर एसटी प्रवाशांमध्ये वाढ पाहिजे तश्या प्रमाणात वाढली नाही. सर्वांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे प्रवाशीसंख्या घटली आहे. अश्या परिस्थितीत एसटी फेऱ्या पूर्ववत ठेवणे कठीण झाले आहे. त्याच मुळे असंख्य एसटी फेऱ्या डिझेल अभावी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. गोरगरीबांची एसटी सुरु करावी अशी मागणी प्रवासी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *