महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 18 ऑगस्ट । नुकताच आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला पण आपल्या पवित्र नद्यांच काय..? आज आपल्या नद्या मात्र प्लास्टिक, निर्माल्य, केमिकल युक्त पाणी आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत.
त्यावर उपाय म्हणून ( अविरत श्रमदान ) आम्ही “इको फ्रेंडली बाप्पा” ही संकल्पना आणि चळवळ सुरू केली आहे . या विषयी महाराष्ट्र २४ शी बोलताना गणेश पानसरे म्हणाले की, ही संकल्पना अशी आहे की आपण संपूर्ण गणेश उत्सव हा आपल्याला इको फ्रेंडली साजरा करायचा आहे गणेश मूर्ती पासून ते विसर्जनापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली हव्यात मूर्ती लालमातीची हवी , आपण ती घरच्या घरी विसर्जन करून त्यात झाड लावू शकतो, नदीत केली तर ती माती नदीत मिसळून जातो कोणतेही प्रदूषण होत नाही , सजावटीसाठी प्लास्टिक चे सामान , चायनीज माळा न वापरता नैसर्गिक सजावट करावी , आरती करताना गाईच्या शेणाचे धूप , भीमसेन कापूर याचा वापर करावा , असे देखील त्यांनी सांगितले .
त्याअंतर्गत आपण लाल मातीच्या मुर्त्या घेणाऱ्यांना एक कुंडी खत आणि रोपटे मोफत देणार आहोत जेणे करून घरच्या घरी सुरक्षित विसर्जन करूया आणि नदी सुरक्षित ठेवूया.
अधिक माहितीसाठी संपर्क:
गणेश पानसरे :9689891535