IND vs ENG : इंग्लंडच्या या खेळाडूंना दुखापतीने ग्रासलं, मालिका वाचवणे अशक्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Lords Test) 151 रनने ऐतिहासिक विजय झाला. पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशीही पावसाने खेळ रद्द झाला नसता तर भारताला विजय मिळवण्याची संधी होती. टीम इंडियाचा हा फॉर्म आणि इंग्लंडच्या खेळाडूंना झालेल्या दुखापती, यामुळे उरलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडचा एक नाही तर तब्बल 6 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. याचा फटका इंग्लंडला बसला आहे.

इंग्लंडला सगळ्यात जास्त कमी जोफ्रा आर्चरची (Jofra Archer) जाणवत आहे. 13 टेस्टमध्ये 42 विकेट घेणाऱ्या जोफ्रा आर्चरला कोपराच्या दुखापतीने ग्रासलं आहे. आर्चरची दुखापत एवढी गंभीर आहे, की त्याला संपूर्ण वर्षभर क्रिकेटपासून लांब राहावं लागणार आहे.

स्विंग बॉलर क्रिस वोक्स (Chris Woakes) हादेखील टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याने 38 टेस्टमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत, तसंच तो चांगली बॅटिंगही करतो. एका टेस्ट शतकासह त्याने 1321 रनही केल्या आहेत. वोक्स टीममध्ये नसल्यामुळे इंग्लंडला ऑलराऊंडरची कमी जाणवत आहे.

जोफ्रा आर्चरला दुखापत झाल्यानंतर इंग्लंडकडे ओली स्टोनचा (Ollie Stone) पर्यायही उपलब्ध होता, पण त्यालाही कंबरेच्या दुखापतीने सतावलं आहे. ओली स्टोनने 3 टेस्टमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. ओली स्टोन 150 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करतो.

जागतिक क्रिकेटमधला दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) हा मानसिकदृष्ट्या अनफिट आहे, त्यामुळे त्याने क्रिकेटमधून अनिश्चितकाळासाठी विश्रांती घेतली आहे. मागच्या 2-3 वर्षात स्टोक्सने इंग्लंडला अनेक टेस्ट मॅच एकहाती जिंकवल्या.

भारताविरुद्ध पहिली टेस्ट खेळणारा स्टुअर्ट ब्रॉ़ड (Stuart Broad) याला लॉर्ड्स टेस्टआधी सराव सत्रादरम्यान दुखापतग्रस्त झाला. ब्रॉडने 524 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. पायाच्या दुखापतीमुळे ब्रॉड संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे.

मार्क वूडने (Mark Wood) लॉर्ड्स टेस्टमध्ये चांगली बॉलिंग केली, पण मॅच संपताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. तिसऱ्या टेस्टसाठीच्या टीममध्ये त्याची निवड केली आहे, पण त्याचं फिट होणं कठीण वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *