भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत ; गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. या शर्यतीत दहाहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. तर परिसरातील बैलगाडी शौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हाव दिलं होतं. ही शर्य होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले होती. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलिस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे.

आयोजकांनी पोलिसांना गुंगारा देत रातोरात झरे गावाशेजारी असलेल्या निंबवडे गावाच्या हद्दीत मैदान तयार केले. गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाजा चालक आणि मालक सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येतेय. शुक्रवारी पहाटेपासूनच मैदानात शर्यत शौकीनांनी गर्दी केली होती. पोलिसांना सुगावा लागण्यापूर्वीच आयोजकांनी शर्यत पार पडली यावेळी मोठ्या संख्येने शर्यत शौकिनांची गर्दी होती.

पोलीस पोहोचताच बैलगाडी मालक व शर्यत शौकीन निघून गेले. पोलिसांनी बळाचा वापर करत शर्यत रोखण्याचा प्रयत्न केला. शर्यत पार पडल्याने राज्य सरकारला योग्य संदेश पोहोचला आहे. पशुधन वाचविण्यासाठी शर्यत झालीच पाहिजे. बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी पुढील आंदोलन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कटगुण गावातून लवकरच सुरू करणार आहे. राज्यभरातील बैलगाडी मालक कटगुणमधून बैलगाडीने मुंबईत पोचतील, अशी घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. दरम्यान, बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. यावर पोलिस काय कारवाई करणार हे आता पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *