सतर्क राहा ! या वेबसाईटद्वारे Hack होऊ शकतं तुमचं Bank Account, अशी होतेय फसवणूक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । कोरोना काळापासून 5000 हून अधिक कोरोनासंबंधित फिशिंग वेबसाईट्स (Phishing Website) समोर आल्या आहेत. तसंच बनावट QR कोड आणि वॅक्सिनेशन सर्टिफिकेट्ससाठी फिशिंग अॅड्सद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या फिशिंग, बनावट वेबसाईट खोट्या पेमेंट ऑफर, डिस्काउंटमध्ये कोविड टेस्ट करणं अशा अनेक गोष्टींद्वारे युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या होत्या.

सायबर सिक्योरिटी फर्म Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 ते जुलै 2021 पर्यंत अशा फिशिंग वेबसाईटवर जाणाऱ्या, अशा वेबसाईट ओपन करणाऱ्या एक मिलियनहून अधिक युजर्सला वाचवण्यात आलं आहे. मार्च 2021 मध्ये कोरोनासंबंधित स्कॅम करण्याचा प्रकार सर्वात टॉपला होता.

कोरोनाच्या नावाने फसवणूक करताना सायबर क्रिमिनल्सचं लक्ष्य युजर्सचा डेटा मिळवणं हे असतं. फिशिंगचा उपयोग यासाठी केला जातो, की युजर एखादी जाहिरात किंवा ईमेलच्या लिंकवर क्लिक करतो आणि एखाद्या पेजवर येतो. इथे पेजवर युजरला बँकिंग डिटेल्स विचारले जातात. एकदा युजरने हे डिटेल्स भरल्यानंतर, ही माहिती फ्रॉडस्टर्सकडे पोहोचते आणि फ्रॉड करणारे अकाउंटमधून पैसे काढून घेतात.

त्यामुळे अशा ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी युजर्सनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करुन आपले पर्सनल डिटेल्स देऊ नका. तसंच ईमेलवर आलेल्या अनोळखी मेलवरही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *