Gold Silver Price Today : पुन्हा एकदा महागले सोने , तपासा चार शहरांतील भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold-Silver Price Today) तेजी पाहायला मिळालीय. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा वाढलेत. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या भाव 46,600 रुपयांवर गेला असून, सोन्याच्या किमतीत (Gold Rates Today) आज 270 रुपयांची वाढ नोंदवली गेलीय.

चांदी (Silver Rates Today) झाली स्वस्त
गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 46,130 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले होते. दुसरीकडे चांदी (Silver Rates Today) स्वस्त झाली असून, चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झालीय. तसेच चांदीचा दर 62,200 रुपये प्रति तोळा झालाय. आज मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा जास्त आहेत.

महत्त्वाच्या शहरांमधील सोने-चांदीचे दर
? मुंबई
? सोने प्रतितोळा (22 कॅरेट) : 46,400 रुपये
? सोने प्रतितोळा (24 कॅरेट) : 47,400 रुपये

? पुणे
?सोने प्रतितोळा (22 कॅरेट) : 45,590 रुपये
?सोने प्रतितोळा (24 कॅरेट) : 48,810 रुपये

? नाशिक
?सोने प्रतितोळा (22 कॅरेट) : 45,550 रुपये
?सोने प्रतितोळा (24 कॅरेट) : 48,750 रुपये

? नागपूर
?सोने प्रतितोळा (22 कॅरेट) : 46,400 रुपये
?सोने प्रतितोळा (24 कॅरेट) : 47,400 रुपये

?दिल्ली
?सोने प्रतितोळा (22 कॅरेट) : 46,390 रुपये
?सोने प्रतितोळा (24 कॅरेट) : 50,610 रुपये

सोने 50,000 रुपयांपर्यंत जाणार
तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. गुंतवणूकदार YOLO मेटलमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *