तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात हा एकमेव मोठा बदल होऊ शकतो, कोणता जाणून घ्या.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना काही दिवसांतच सुरु होणार आहे. पण या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात एक मोठा बदल होऊ शकतो, असे दिसत आहे.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला होता. विजयानंतर शक्यतो संघात मोठे बदल केले जात नाहीत, पण तिसऱ्या कसोटीत मात्र एक मोठा बदल होऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जडेजाला विकेट्स मिळवण्यात यश मिळाले नाही. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात फलंदाजीमध्ये जडेजाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाला संघाबाहेर ठेवण्यात येऊ शकते. जडेजाच्या जागी भारतीय संघात आर. अश्विनचा समावेश करण्यात येऊ शकतो. अश्विनला जेव्हा पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी वगळण्यात आले होते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कारण अश्विनला संघाबाहेर काढण्याचे कोणतेही सबळ कारण त्यावेळी दिसत नव्हते. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. पण या दोन्ही सामन्यांत जडेजा अपयशी ठरत असल्याचे दिसल्यामुळे तिसऱ्या सामन्यात आता अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अश्विन हा कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स मिळवू शकतो आणि आतापर्यंत त्याने ते सिद्धही केले आहे. त्याचबरोबर अश्विन हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो, त्यामुळे त्याला चांगलाच फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन भारतीय संघात आपल्याला दिसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *