संग्राम बाल मित्र मंडळातर्फेे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा

Spread the love
नवी मुंबई । महाराष्ट्र 24 ।युगपुरुष, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तारखेनुसार) संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी  शिवनेरीवर झाला. यानिमीत्त यावेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री १२ वाजताच शिवजयंती साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे कळंबोली येथील सेक्टर 1 मधील एलआयजी 2 येथे संग्राम बाळ मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लहानग्यांसाठी व्याखान, नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नागिरकांनी तसेच रहिवाशांनी मोठ्या संख्येने भरभरून सहभाग नोंदविला. सकाळी 12.05 वाजता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व प्रतिमेचे पुष्पाहार अपर्ण करून पुजन  करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता मंडळाचे पदाधिकारी बबनराव पवार यांच्या हस्ते शिवआरती व बालकलाकारांच्या शिव इतिहासपर व्याख्याने व पोवाडे स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी  “जय जिजाऊ जय शिवराय” छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी कळंबोली परिसर निणादून गेला. या नंतर परिसरातील महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी दर्शविली उपिस्थती…
यावेळी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे,  रमेश जगदाळे, नितीन बोरसे, सुर्यकांत पतंगे, सुरेश जगदाळे, रोहिदास भोसले, मंगेश जगदाळे, अनिरुद्ध जगदाळे, श्रावण सूर्यवंशी, रमेश जाधव, अभिजीत जगदाळे, अनिरुद्ध जगदाळे,अरुण हुगर तसेच संग्राम महिला मंडळाच्या सदस्या, अश्विनी जगदाळे, माधुरी बोरसे, अनिता भोसले, स्वाती जगदाळे, राजश्री हुगर, ज्योती कानडे, सविता गायकवाड, रंजना बोराटे व मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  यांच्या हस्ते विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ 
यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण समारंभ घेण्यात आला. यामध्ये, जिल्हा सहसचिव तथा उपाध्यक्ष प्रभाग समिती पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस मा.बबनराव वसंतराव पवार, मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र समन्वयक गणेश काटकर, माण मनसेचे सतिश जाधव, नितीन बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष रमेश जगदाळे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. 
प्रतिक्रिया… 1
ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा हा आजचा दिवस. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करुन मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवली. ४०० वर्षापूर्वी रोवलेल्या या बीजाचं पुढे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालं. त्यामुळेच शिवभक्तांसाठी हा दिवस हा फार मोठा  आहे. 
– बबनराव वसंतराव पवार
 जिल्हा सहसचिव तथा उपाध्यक्ष प्रभाग समिती पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस
प्रतिक्रिया… 2
आमच्या मंडळाच्या वतीने लोकोपयोगी, समाजपयोगी विविध कार्यक्रम घेतले जातात. हे कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकार्यांनी जे सहकार्य केले. आपले अनमोल योगदान दिले. त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. यापुढेही संग्राम बाळ मित्र मंडळातर्फे असेच परिसरातील महिला, अबाल वृद्ध, तसेच लोकहिताचे मनोरंजक विविध कार्यक्रम आम्ही घेऊ अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्वाही देतो. 
– रमेश विष्णू जगदाळे,
अध्यक्ष, संग्राम बाळ मित्र मंडळ, कळंबोली नवी मुंबई तथा 
विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन
प्रतिक्रिया… 3
‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता आहे. शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. म्हणूनच अशा या युगपुरुषाला त्रिवार वंदन. आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहू. मी एक महिला या नात्याने आमच्या प्रत्येक महिला भगिनीला या शिवजयंतीनिमित्त ग्वाही देते की तुमच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आपल्या सोबत राहीन.
-आश्विनी जगदाळे
अध्यक्षा, प्रभाग क्रमांक 10 कळंबोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *