देशातील पहिलेच मद्यसंग्रहालय गोव्यात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । हिंदुस्थानातील नयनरम्य सागरकिनारे असलेले गोवा त्याच्या वेगळय़ा ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे विशेष केंद्र राहिले आहे. समुद्रकिनारी असलेल्या राज्याची आणखी एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे येथील स्थानिक दारू ‘फेणी’. या फेणी दारूचा जीवनप्रकास सांगण्यासाठी संग्रहालय तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारचे देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय आहे. एका वृत्तवाहिनीने या संग्रहालयाबाबत वृत्त दिले आहे.

स्थानिक व्यावसायिक कुडचडकर यांनी गोव्याच्या कंडोलिम गावात अनोखे मद्यसंग्रहालय बांधले आहे. कुडचडकर यांनी संग्रहालयाला ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ असे नाव दिले आहे. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्टय़ म्हणजे, काजूपासून बनवलेली दारू साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱया कलाकृती चिनी मातीपासून बनलेल्या गोलाकार भांडय़ात ज्याला मर्तबान म्हटले जाते ते येथे पाहावयास मिळते. दारू साठविण्याचे मर्तबान आणि जार येथे पाहावयास मिळतील. गेल्या कित्येक शतकांपासून या पारंपरिक काचेच्या भांडय़ात दारू साठविली जाते.

संग्राहक नंदन कुडचडकर म्हणतात, मद्यसंग्रहालय तयार करण्यामागे एक संदेश आहे. ज्यात गोव्याच्या विशेष सांस्कृतिक वारशाची कथा, विशेषतः फेणीची सुरुवात आणि ब्राझील ते गोवा या मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी मला लोकांनी सांगायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *