पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन : विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । कोरोनामुळे (Corona) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) कित्येक लोकांचा रोजगार हिरावला गेला. अनेकांवर बेरोजगारीची (Unemployment) कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आजही आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. मात्र, आता अनलॉकमध्ये पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre) वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं (Online Job Fair) आयोजन करण्यात आलं आहे. यामेळाव्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Pune District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre has organized an online job fair)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 2 सप्टेंबरला हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह, क्वालिटी चेकर, मशिन ऑपरेटर, हेल्पर इत्यादी प्रकारची पदे उपलब्ध असणार आहेत. यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्याच्या आधारावर रोजगार उलपब्ध करून दिला जाणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित केलेला हा पाचवा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आहे. यामध्ये अधिकाधिक तरूणांनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवरचा अर्ज पूर्ण भरून द्यावा लागेल.

याठिकाणी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करावा लागेल. याबाबत काही अडचण आल्यास 020-26133606 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *