महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. नारायण राणेंच्या अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या अटकेमुळं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे,