Horoscope : ‘या’ राशींना आनंदाने भरलेला असेल आजचा शुक्रवार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट ।

मेष : आज तुमचा उत्साह दांडगा असेल. आर्थिक गोष्टींकरता आजचा दिवस शुभ आहे. महिला किचनच्या कामात अधिक सतर्क राहतील. तसेच काहीजण आज छोटोसा व्हॅकेशन प्लान करतील.

वृषभ : शुक्रवार तुमच्यासाठी मस्त असणार आहे. आज समृद्धीकडे वाटचाल करेल. व्यापार आणि कामात वाढ होईल. वैवाहिक गोष्टींची चर्चा सुरू असेल तर यश मिळेल.

मिथुन : आज कोणताही विचार केलात तर त्यामध्ये यश मिळेल. भाग्यात वाढ होण्याची शक्यता. व्यापारात पार्टनशिर करू नका. मनातील गोष्ट शेअर करा. धनलाभ संभवतो.

कर्क : शुक्रवार तुमच्यासाठी खास असेल. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवहारात परिवर्तन करण्याची गरज आहे. घरात आणि बाहेरही प्रसन्न वातावरण अशेल.

सिंह : आपल्या खासगी कामात अधिक लक्ष द्या. कोणत्या नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांसाठी आजचा शुक्रवार महत्वाचा.

तूळ : दिवस उत्तम जाईल . आज नवीन जोश असेल. चांगल्या गोष्टी समोर घडतील. नवीन व्यवहारांकडे लक्ष द्या. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. घरात चांगले बदल होतील.

वृश्चिक : शुक्रवार तुमच्यासाठी स्पेशल असेल. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस वेगळा असेल. व्यवहारात यश मिळेल. आर्थिक फायदा संभवतो. आरोग्याची काळजी घ्या .

धनू : आज जो शब्द द्याल तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामात चांगल्या डील यशस्वी होतील. उत्साह चांगला असेल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. नोकरदारांना दिवस चांगला जाईल .

मकर : आजच्या कामात यश मिळेल. बचत गोष्टीत गुंतवणूक कराल. कामात प्रगती कराल. मोठे बदल होतील. व्यवसायात फायदा होईल , आरोग्य बरे असेल.

कुंभ : आज दिवस चांगला जाईल . दगदग करू नका . आज व्यवहार फार चांगले होतील. मुलांकरता ऑनलाईन शॉपिंग करा. प्रियजनांवर अवलंबून असाल. आरोग्य ठीक असेल

मीन : आज तुम्ही बोलण्याने लोकांना प्रभावित कराल. आपला सगळा फोकस टार्गेटवर ठेवा. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. कामाप्रती निष्ठा ठेवा. कुटुंबात शुभ कार्य संपन्न होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *