महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी नेहमीच सर्व सामान्य नागरिकांची सेवा केली नागरिकांच्या अडी अडचणींना धाऊन जाणे हा त्यांचा स्थायीभाव होता .गोरगरीब, गरजवंत नागरिकांना यापुढेही मदत करत राहणे हीच जावेद शेख यांना खरी श्रद्धांजली राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री संजोग वाघेरे यांनी केले. जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यसमरण दिनी 31 जुलै रोजी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी अंतर्गत आज 26 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या चष्मा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका वैशालीताई काळभोर ,माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी ,जावेद शेख यांचे वडील रमजान शेख, बंधू झाकीर रमजान शेख आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आण्णा कुऱ्हाडे, ह.भ.प.सुरेश महाराज वारके आदी उपस्थित होते .
उच्च आणि चांगल्या प्रतीचे चष्मे मोफत वाटप करण्याचा उपक्रम चांगला असून झाकीर शेख आणि इखलास सय्यद यांचे कौतुक केले.यावेळी वैशालीताई काळभोर, प्रसाद शेट्टी , ह.भ.प. सुरेशमहाराज वारके, ज्ञानेश्वर ननावरे, आर.जी.जाधव यांनी मनोगत व्यक्त केले इखलास सय्यद यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सुभाष चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश भोरकर, प्रवीण पवार नानासाहेब पिसाळ, आशा शिंदे, विमल गायकवाड,वसंत सोनार, गौतम बेंद्रे, आण्णा भोसले, तोरणे मामा, संगीता पारेख,गीता सुतार, सुलभा धांडे, अर्चना चौधरी, सुनील पाटील, यशवंत भालेराव, जावेद पठाण, निलेश कदम,यांनी परिश्रम घेतले या संपुर्ण उपक्रमासाठी श्री राजू मिसाळ विरोधी पक्षनेते यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ,प्रगती महिला विकास मंडळ,आपुलकी मित्र मंडळ, व समस्त जावेद शेख मित्र परिवार यांनी केले.