Xiaomi ने भारतात दोन नवीन लॅपटॉप केले लॉन्च ; SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, पहा किंमत…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । Xiaomi ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. Mi नोटबुक प्रो आणि Mi नोटबुक अल्ट्रा हे दोन्ही लॅपटॉप्स गुरुवारी दुपारी Mi Smarter Living 2022 या कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले. या इव्हेंटदरम्यान कंपनीने Mi Band 6, Mi TV 5X आणि आणखी काही उत्पादनं लाँच केली आहेत. (Mi Band 6 launches in India with 30 fitness modes, SpO2 monitoring feature, know price and features)

भारतात Mi Band 6 ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. बँडची किंमत Mi Band 5 पेक्षा जास्त आहे आणि रेडमी वॉचइतकीच आहे. एमआय बँड 6 एक इंटरचेंजेबल स्ट्रॅपसह येतो जो सहा वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, यात ब्लॅक, ऑरेंज, ऑलिव्ह, यलो, आयवरी आणि ब्लू या रंगांचा समावेश आहे. सर्व स्ट्रॅप स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागतील. फिटनेस बँडमध्ये 1.56-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त बँड फेसेस आहेत जे Mi Wear अॅप वापरून कस्टमाइज केले जाऊ शकतात. हा Android आणि iOS दोन्हीला सपोर्ट करतो.

Mi Band 6 मध्ये 30 फिटनेस मोड आहेत. बँड SpO2 मॉनिटरिंग देखील ऑफर करतो ज्याद्वारे आपण आपल्या बल्ड-ऑक्सिजनची पातळी मोजू शकतो. Mi Band 6 स्लीप ट्रॅकिंगसह येतो. यात हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 फीचर आहे. फिटनेस बँड एकूण 14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह सादर करण्यात आला आहे. हा बँट 5ATM वॉटर रसिस्टेंट आहे.

Mi नोटबुक अल्ट्रा आणि नोटबुक प्रो ची किंमत
हे सेकेंड जनरेशन Mi नोटबुक लॅपटॉप आहेत आणि ते गेल्या वर्षीच्या Mi Notebook 14 ची जागा घेतील. शाओमीने आधीच पुष्टी केली आहे की नवीन लाइन-अप गेल्या वर्षीच्या सिरीजची जागा घेईल. याचा अर्थ असा की Mi नोटबुक 14 सिरीजमधील सर्व मशीन फक्त स्टॉक संपेपर्यंत विकल्या जातील. भारतात Mi Notebook Pro ची किंमत कोर i5 प्रोसेसरसह 8GB रॅम व्हेरिएंटसाठी 56,999 रुपये, कोर i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये आणि कोर i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 72,999 रुपये इतकी आहे. भारतात Mi Notebook Ultra ची किंमत Core i5 प्रोसेसर असलेल्या 8GB RAM व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये, Core i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 63,999 रुपये आणि Core i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 76,999 रुपये इतकी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *