महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । एलपीजी सिलिंडरवर मिळणारी सरकारी सबसिडी रद्द झाली आहे का? असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात सतत उद्भवत असतो. दिल्लीतील एका ग्राहकालाही हाच प्रश्न पडला होता. या ग्राहकाने आपली शंका दूर करण्यासाठी थेट केंद्र सरकारला ट्विट करत याबाबत प्रश्न विचारला. त्याच्या या ट्विटला सरकारने उत्तर देखील दिले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या eSeva सुविधेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिल्लीतील ग्राहक सी एल शर्मा यांनी सरकारला प्रश्न केला की, ‘आम्ही पुन्हा एकदा जाणून घेऊ इच्छितो की मोदी सरकारने एलपीजीवरील सबसिडी रद्द केली आहे का, कारण गेल्या 18 महिन्यांत आमच्या खात्यात सबसिडीचा एकही पैसा जमा झाला नाही. मात्र गॅस एजन्सी वाउचरवर 859 रुपयांच्या सिलिंडरसाठी subsidised cylinder असे लिहिते.